Bachelor Road, Nalwadi, Wardha.
Maharashtra, India
Mobile: +91 9975497786, +91 9890615723
डॉक्टर डे निमित्य वृक्षारोपण
लोकसंख्या बदलते हवामान जमिनीची घटती उत्पादकता याचा एकूणच मानवी जीवनावर पडणारा परिणाम लक्षात घेता पर्यावरण संवर्धन गरजेचे असल्याचे मत इनर व्हील क्लबच्या अध्यक्षा रुपाली डांगे यांनी व्यक्त केले 1 जुलै डॉक्टर डे तथा सीए डे चे औचित्य साधून वुमन डेव्हलपमेंट सेल, राष्ट्रीय सेवा योजना इंद्रप्रस्थ न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज तथा इनर व्हील क्लब वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी त्या बोलत होत्या. तर कोविड महामारीच्या काळात डॉक्टरांनी बजावल्या महत्वाच्या सेवेला प्राचार्य डॉ. आशिष ससनकर यांनी उजाळा दिला. यावेळी गृह अर्थशास्त्र प्रमुख तथा वुमन डेव्हलपमेंट सेल च्या संचालिका प्रा.कांचन इंगोले शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. मदन इंगळे, डॉ. वंदना पळसापुरे मीरा उमरे, सिंधू गोयनका, विजया मोहता, रिया मुनोत मनू चुडीवाले संध्या घोंगडे आदी उपस्थित होते.
कायक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे संयोजक डॉ. हेमंत मिसाळ यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. संदीप पेटारे यांनी पार पडले.